दगडूशेठ हलवाई ट्रस्टने घेतला 'हा' मोठा निर्णय

10 Aug 2020 21:46:54
१२७ वर्षांची परंपरा पहिल्यांदाच खंडित
 
 
पुणे : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. अनेक सार्वजनिक मंडळांनीदेखील साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने १२७ वर्षांची परंपरा खंडित करत एक मोठा निर्णय घेतला आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्टने यंदाचा गणेशोत्सव मंदिरातच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंडळांने सामाजिक भान जपत हा निर्णय घेतला आहे.
 

dagadusheth-halwai_1  
 
 
यंदाचा गणेशोत्सव मंदिरात साजरा करत असताना भक्तांना बाप्पाच्या ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मंदिरात प्रवेश न करता बाहेरून दर्शन घेता येणार आहे. उत्सवाचे आकर्षण असलेले महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण, विद्यार्थ्यांचे अथर्वशीर्ष पठण यांसह इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मंदिरात उत्सव साजरा करत असताना आरोग्य विषयक जनजागृती तसेच आरोग्य सेवा देण्यात येणार आहे.
 
 
 
पुण्यातील दगडूशेट गणपती उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे एखाद्या ऐतिहासिक मंदिराची प्रतिकृती उभारून दरवर्षी दगडूशेठ गणपती विराजमान व्हायचे. मात्र, यावर्षी मांडव किंवा मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार नाही. अतिशय साधेपद्धतीने आणि कोरोनाच्या पृष्ठभूमीवर सोशल डिस्टन्शिंगचे सर्व नियम पाळत गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0