पारोळ्यात भाजपाचे आंदोलन

    दिनांक : 01-Aug-2020
Total Views |

parola_1  H x W
माजी खासदारांनी केली जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार;
मका खरेदी प्रकाराकडे लक्ष देण्याची केली मागणी
तभा वृत्तसेवा
पारोळा : भाजपा महायुतीतर्फे पारोळ्यात शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी शनिवारी आंदोलन करण्यात आले.
माजी खा. ए.टी.पाटील यांनी शेतकर्‍यांच्या तक्रारी व मागणीवरून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे पारोळा तालुक्यातील बंद पडलेले मका खरेदी व खरेदी करण्यात आलेल्या मका प्रकरणी तक्रार करून झालेल्या प्रकाराची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
 
तालुक्यात तीन दिवसापूर्वी अचानक सुरू असलेली मका खरेदी बंद करण्यात आली आहे. शेतकर्‍यांना पूर्वसूचना न देता खरेदी बंद केल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. खरेदी केंद्र बाहेर मोजनीच्या प्रतीक्षेत आजही शेतकरी बाहेर उभे आहेत. पाच-सात दिवस उलटूनही मका खरेदी होत नसल्याने दिवसला हजार रुपये याप्रमाणे शेतकर्‍यांना वाहनांचा भुर्दंड भरावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचा संतप्त झाला आहे. मका खरेदी तात्काळ सुरू करावी अशी तो मागणी करीत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी खरेदी करण्यात आलेले मका खरेदीत शेतकरी संघ वतीने मोठा घोळ करण्यात आला आहे. त्यामुळे बरेच प्रामाणिक शेतकरी या खरेदी पासून लांब राहिला असल्याच्या तक्रारी आहेत.
 
भाजपातर्फे माजी खा.ए टी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या विविध मागण्या व समस्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलननंतर पोलीस निरीक्षक यांच्या कक्षमध्ये शेतकर्‍यांनी माजी खा. ए टी पाटील यांच्याकडे बंद पडलेला मका खरेदीमुळे शेतकर्‍यांचे होत असेलेले नुकसान व त्रास बद्दल व्यथा व्यक्त केल्या. त्यांच्या व्यथा पाहून माजी खा.पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून बंद पडलेली मका खरेदी सुरू करण्यासंदर्भात उपाययोजना करावी. मका खरेदी घोळची चौकशी करून सर्वसामान्य शेतकर्‍यांना न्याय द्यावा आणि खरेदी केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन सार्‍या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी शेतकर्‍यांसमोर केली. डॉ जिल्हाधिकारी यांनी माजी खासदारांच्या मागणीला दुजोरा देऊन भेटीची ग्वाही दिली आहे.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष अतुल मोरे, शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, भाजप शिक्षक सेल तालुका अध्यक्ष जितेंद्र चौधरी,धीरज महाजन, रवींद्र पाटील, सचिन गुजराथी, समीर वैद्य, गौरव बडगुजर, संकेत दानेज यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.