जिल्ह्यात शनिवारी २८५ नवीन कोरोना पॉझिटीव्ह तर २८४ झालेत बरे

    दिनांक : 01-Aug-2020
Total Views |
 
Corona_1  H x W
 
जळगाव, १ ऑगस्ट
जिल्ह्यात शनिवारी २८५ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. तर दिवसभरात २८४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात शनिवारी २८५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून त्यात सर्वाधिक ७५ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. तर जामनेर आणि चाळीसगाव येथे कोरोना संसर्ग वाढला आहे.
 
 
असे आहेत नवीव कोरोनाबाधित
जामनेर ३५, चाळीसगाव २७, जळगाव ग्रामीण १८; भुसावळ १२; अमळनेर १६; चोपडा २०; पाचोरा २३; भडगाव ११; धरणगाव २५; यावल १; रावेर ९; पारोळा ६; मुक्ताईनर ६ आणि दुसर्‍या जिल्ह्यातील १ असे रूग्ण आढळून आले आहेत.
 
९ रूग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू
दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ११ हजार ३८८ इतकी झाली आहे. त्यापैकी ७ हजार ८४१ रूग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून ३ हजार २० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे शनिवारी ९ कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे आजवर मृत रूग्णांची संख्या ५२७ इतकी झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी कळविले आहे.