लॉकडाऊनमध्ये विहिंप, बजरंग दलातर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी

08 Jul 2020 21:13:05

VHP_1  H x W: 0 
 
जळगाव, ८ जुलै
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शहरात जिल्हाधिकार्‍यांनी १३ जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. याकाळात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून प्रशासनासोबत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
 
 
या ७ दिवसांच्या लॉकडाऊन काळात मनपातर्फे शहरातील नागरिकांचे घरी जाऊन आरोग्य तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत मनपाचे शिक्षक हे नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांचे शारीरिक तापमान तसेच श्वसनक्रिया मोजणी यंत्राद्वारे तपासण्या करीत आहेत. त्याचा शिक्षकांवर अतिरिक्त भार पडू नये यासाठी विश्व हिंदू परिषद - बजरंग दलाचे कार्यकर्ते या शिक्षकांसोबत त्यांना सहकार्य करीत आहेत.
 
या सर्वेक्षणामध्ये विहिंप जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार, बजरंग दल जळगाव जिल्हा संयोजक राकेश लोहार, जिल्हा समरसता प्रमुख भरत कोळी, प्रचार प्रसिद्धी प्रमुख महेश अंबिकार, महानगर उपाध्यक्ष हरीश कोल्हे, विश्व हिंदू परिषद महानगर मंत्री दीपक दाभाडे, बजरंग दल महानगर संयोजक समाधान पाटील, सह पवन झुंजारराव, राजेंद्र नन्नवरे, कवी कासार, आकाश पाटील, गणेश बच्छाव, मुकेश पाटील, दीपक झुंजारराव, मंगेश काजवे, राहुल जोशी, राहुल पाटील, संदीप महाले, महेश ठाकुर, किरण परदेशी, आकाश जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या मोहिमेमध्ये सहभागी असणार आहेत.
Powered By Sangraha 9.0