मंठा येथील नववधूचा खून करणार्‍याला फाशी देण्याची धरणगाव शिवसेना महिला आघाडीची मागणी

08 Jul 2020 21:27:32
 
धरणगाव : येथील शिवसेना महिला आघाडीतर्फे तहसीलदार नितिन कुमार देवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांना वैष्णवी नारायण गोरे रा. मंठा जि. जालना या नवविहाहीतेला तिचा कुटुंबाला न्याय मिळावा ही मागणी करण्यात आली असून शिवसेनेतर्फे रणरागिणीनी निवेदन सादर केले.
 
 

Dharangaon_Shivsena Nived 
 
 
जालना जिल्ह्यातील मंठा या गावात वैष्णवी नारायण गोरे या मुलीच्या एका नराधमाने दिवसाढवळ्या भर रस्त्यात खून केल्याची घटना घडली. दुर्दैवाची बाब म्हणजे तिच्या पाच दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. लग्नानंतर पहिल्यांदा ती माहेरी आली होती. तिचे वडील रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबीची आहे. अशा परिस्थितीत त्यांनी मुलीचे लग्न केले. लग्नानंतर पाच दिवसांनी त्यांना आपल्या मुलीच्या दुर्दैवी अंत बघावा लागला. महाराष्ट्रात प्रत्येक मुलीला सुरक्षितता वाटली पाहिजे. प्रत्येक स्त्रीला निर्भयपणे जगता आले पाहिजे, असा कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित होणे गरजेचे आहे. अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी हे लोकप्रतिनिधी महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तिला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
 
शिवसेना तालुका धरणगाव आणि महिला आघाडीच्यावतीने पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत. वैष्णवी गोरेंच्या खुनाचा पोलीस यंत्रणेद्वारा निष्पक्ष कोणतीही त्रुटी न राहता कमीत कमी वेळात तपास पूर्ण करून न्यायालयात खटला दाखल करणे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करणे. तज्ञ सरकारी वकिलांची नेमणूक करणे, पोलीस स्टेशनला मुलींचे छेडखानीबाबत तक्रार आल्यास त्याची त्वरित दखल घेणे आणि कार्यवाही करणे, निर्भया पथकाची जास्तीत जास्त संख्येने स्थापना करणे आणि मुलींमध्ये निर्भयता जागृती निर्माण करणे.
 
 
शिवसेना महिला आघाडी आणि पदाधिकार्‍यातर्फे या घटनेचा निषेध करीत करण्यात आला. संबंधित आरोपीला त्वरीत फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या गोष्टीची ताबडतोब कार्यवाही न केल्यास सर्व नारी शक्तितर्फे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी धरणगाव माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन, नगरसेविका अंजली भानुदास विसावे ,कीर्ती मराठे, आराधना पाटील, शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख रत्नाताई धनगर, सुनिता चौधरी, प्रा. कविता महाजन, हेमांगी अग्निहोत्री, भारतीताई धनगर आदी महिला उपस्थित होत्या.
Powered By Sangraha 9.0