६ जुलैच्या कारवाईतील दुकानांचा दंड माफ करण्याची मागणी

08 Jul 2020 21:17:41

sdf_1  H x W: 0
 
जळगाव, ८ जुलै
मनपा क्षेत्रात जिल्हाधिकार्‍यांनी १३ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊन असल्याने ६ रोजी बाजारात खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती. लॉकडाऊन संदर्भात नियमांचे उल्लंघन करण्याचा दुकानदारांचा कोणताही हेतू नसला तरी नागरिकांना आवर घालणे कुणालाही शक्य नव्हते. सोशल डिस्टन्सिंग नसल्याने मनपा प्रशासनाकडून काही दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या दिवसाची परिस्थिती लक्षात घेता ज्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे त्यांच्याकडून दंड वसूल न करता दुकानांचे सील उघडावे अशी मागणी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाकडून मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
 
या गर्दीसाठी दुकानदारांना जबाबदार न धरता त्यांना कोणताही दंड न लावता दुकानांचे सील उघडून द्यावे, अशी मागणी जिल्हा व्यापारी महामंडळाकडून करण्यात आली. यासंदर्भात महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललित बरडीया यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले.
Powered By Sangraha 9.0