अखिल भारतीय विद्यार्थी परिषद : विद्यार्थी, राष्ट्रहित जोपासणारी जागतिक संघटना

    दिनांक : 08-Jul-2020
Total Views |
 
 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्थापना दिन विशेष
 
 
 

ABVP_1  H x W:  
 
 
९ जुलै १९४९ या ऐतिहासिक दिनी राष्ट्रीय पुनर्निर्माणाचा व्यापक उद्देश्य घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली. स्वातंत्रप्राप्तीनंतर युवकांना योग्य दिशा देण्यासाठी अभाविपची वाटचाल सुरु झाली. ज्ञान, शील, एकता या त्रिसूत्री मंत्रावर शैक्षणिक ,सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असताना आज ७२ व्या वर्षात अभाविप पदार्पण करीत आहे. छात्रशक्ति हिच खरी राष्ट्रशक्ती या विचारातून लाखो कार्यकर्ते अभाविप संस्कारात घडत आहेत. राष्ट्रीय सुरक्षाविषयी भारतातील बांग्लादेशी घूसखोरी विरोधात सरकारने कठोर पाऊले उचलावीत यासाठी अभाविपने किशनगंज येथे चलो चिकननेक अशी हाक देत भारतीय सीमेचे सर्वेक्षण करून तत्कालीन राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना सर्वेक्षण अहवाल सादर केला. श्रीनगरच्या लाल चौकात अतिरेक्यानी तिरंगा ध्वजाचा अवमानाच्या विरोधात हजारो अभाविप कार्यकर्ते श्रीनगरच्या दिशेने निघाले जहॉं हुवा तिरँगे का अपमान , वही करेंगे उसका सन्मान असे ठासुन सांगणारी संघटना म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद होय. भारताची राष्ट्रभाषा हिंदी असावी , मतदानाचा अधिकार १८ व्या वर्षी मिळावा.अश्या प्रमुख भूमिका अभाविप म्हणून मांडण्यात आल्या होत्या.शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या विरोधात विविध आंदोलने करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करणारी जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याना मिळावे ही अभाविप आग्रही भूमिका आहे .शैक्षणिक समस्या सोडविन्यासाठी अभाविपने अनेक शैक्षणिक आंदोलने करत सर्वसामान्य विद्यार्थ्याना न्याय मिळवून दिला आहे. विविध कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्यासाठी व्यासपीठ अभाविप म्हणून उपलब्ध करण्यात येते.विद्यार्थ्याना महाविद्यालय परिसरात प्रवेशापासून ते निकालापर्यत येणार्‍या समस्या सोडविणयासाठी अभाविप तत्पर असते.
 
 
प्रवेश मदत केंद्र
अभाविप जामनेरच्या वतीने नवीन प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविन्यासाठी मदतकेंद्र उभारणी करण्यात येते याद्वारे हजारो नवीन विद्यार्थ्याना लाभ मिळतो. विद्यार्थ्याना मोफत बस पासेस मिळाव्या यासाठी अभाविपने मागणी करून पाठपुरावा करण्यात आला होता. व मोफत बस पासेस उपलब्ध होत गरजू विद्यार्थ्याना लाभ मिळाला
 
 
सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम
१५ ऑगस्ट स्वातंत्र दिनानिमित्त विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करत तिरंगा पदयात्रा , एक शाम देश के नाम देशभक्तिपर गितांचा कार्यक्रम अभाविप जळगाव वतीने आयोजित करण्यात येतो. महिला सक्षमीकरण्याच्या दृष्टिकोणातून अभाविप जळगाव च्या वतीने मिशन साहसी उपक्रम अंतर्गत विद्यार्थीनीना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. परीक्षा शुल्क माफ करण्याची अभाविपची आग्रही मागणी पूर्ण होत हजारों विद्यार्थ्याना लाभ मिळाला. जनजाती नेतृत्व विकास शिबिर आयोजित करून जनजाती विद्यार्थ्याना व्यासपीठ अभाविप मुक्ताईनगरच्या वतीने करण्यात आले.
 
 
कोविड -१९ (कोरोना) जगावर आलेले मोठे संकट जेव्हा जेव्हा संकटं येतात तेव्हा ती माणसाच्या क्षमतांची परीक्षा घेतात. स्वामी विवेकानंदांनी तरुणाईच्या क्षमतेवर दाखवलेला विश्वास या देशातल्या तरुणांच्या मनात आजही स्फुल्लिंग चेतवतो. जेव्हा आपल्या आसपास कोरोनामुळे घबराट, चिंता अन नैराश्याचं वातावरण तयार झाले त्यावर मार्ग शोधावा याच उद्देशाने सामाजिक बांधिलकीची भावना जोपासत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात गरजूंसाठी तत्परतेने विविध समाजोपयोगी सेवाकार्य राबविण्यात आले.
 
 
कोरोना काळात वैद्यकीय मदत
लॉकडाऊन काळात ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेचा अभाव मोठ्या प्रमाणात होता. कोरोना व्यतिरिक्त असणार्‍या आजारावर उपचार करण्यास कोणी तयार नसताना अभाविप कार्यकर्त्यांनी सेवाभावी डॉक्टराना हाक देत ग्रामीण भागात जाऊन वैद्यकीय आरोग्य तपासणी करत डॉक्टर आपल्या दारी राबवून ३ तालुक्यातील ६२ गावामध्ये ९५ हजार ९३८ नागरिकापर्यत पोहचत जनजागृती करून २०,६५० मास्क वाटप करत वैद्यकीय मदत पोहचविण्यात आली. लॉकडाऊन काळात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने अभाविप जळगावच्या ४२ विद्यार्थी, कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. लॉकडाऊन घोषित झाल्याने अनेक बाहेरील विद्यार्थी जिल्ह्यातील वस्तिगृहात अडकून होते अश्या ४९७ गरजू विद्यार्थ्याना अभाविप जळगावच्या वतीने जेवण पोहचविण्यात आले.
 
पीएम फंडासाठी २२५० निधी अभाविप कार्यकर्त्यांनी दिला. गरजुना ९५ गरजूंना किराणा किट वाटप करण्यात आल्या. सैनीटायझर २५ लीटर ५०मिली प्रमाणे ५०० कोरोना योध्याना वाटप करण्यात आले. आर्सेनिक अल्बम ३० होमीयौपेथी औषध ४५८ परिवारामध्ये २२४० नागरिकापर्यत पोहचविण्यात आले. आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक नसून तो आजचा नागरिक आहे. आजचा नागरिक हा राष्ट्रहित सर्वोपरी मानून कार्य करणारा आहे. विकसित राष्ट्राच्या जडणघडणीत महत्वपूर्ण भूमिका असणारे सर्व विद्यार्थ्याना राष्ट्रीय विद्यार्थी दिन, अ.भा.वि.प.स्थापना दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
 
 
- मनोज जंजाळ, अभाविप , जळगाव जिल्हा संयोजक