देवेंद्र फडणवीस आज जळगावात

    दिनांक : 07-Jul-2020
Total Views |

fadnvis_1  H x  
 
जळगाव ः माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देेवेंद्र फडणवीस हे बुधवार, ८ जुलै रोजी जळगावच्या दौर्‍यावर येत असून रात्री उशिरा त्यांचे जळगावात आगमन होईल. याबाबत जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसान देवेंद्र फडणवीस मालेगाव येथून जळगाव येथे रात्री पोहचतील. गुरुवार, ९ रोजी सकाळी ९.३० वा. ते जीएमसी कोविड हॉस्पिटलकडे रवाना होतील. तेथे भेट दिल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात येणार असून जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करतील. त्यानंतर ते मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण करतील.