बहीण नांदवत नसल्याच्या रागामुळेशालकाने केला मेव्हण्याचा खुन

30 Jul 2020 21:10:44

jamner _1  H x
संशयीत आरोपी पोलीसात हजर, पोलिस पथकाकडून घटनास्थळी तपासणी
जामनेर : आपल्या बहीणीला नांदवत नसल्याचा प्रचंड राग मनात धरून शालकानेच नामी शक्कल लढवून मेव्हण्याचा खुन करून कायमचा संपविला. घटनेतील संशयीत आरोपीताने स्वतःहून पोलीस ठाण्यात बुधवार रात्री साडेसातच्या दरम्यान हजेरी लाऊन मी माझ्या मेव्हण्याचा खुन केल्याची कबुली दिली.
 
विशेष म्हणजे हजर झाल्यावेळी त्याच्या हातामधे रक्ताने माखलेला भला-मोठा चाकू सुध्दा होता असे सूत्रांनी सांगीतले. जामनेर-बोदवड रस्त्यावरील लहासर फाट्यानजीक पोलीस आरोपीला सोबत घेऊन गेले मात्र पाऊस आणी तो मद्यधुंद असल्याने याठिकाणी निटपणे दाखवीत नव्हता,त्यामुळे गुरूवार सकाळी पुन्हा पोलीसपथक घटनास्थळी तपासासाठी गेले.
भागवत मोतीराम पारधी (मेव्हणा) वय ३० रा. चिंचखेडा बुद्रुक ता.जामनेर असे मयताचे नाव आहे. तर संशयीत आरोपीचे (शालक)परमेश्वर प्रकाश पारधी (आढाळे) वय २५ रा.नेरी ता. जामनेर असे आहे.
 
 
याबाबत सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की, सुमारे तीन वर्षांपुर्वी (२०१७) आरोपी परमेश्वच्या बहीणीचे (सुरेखाबाई) हिचे लग्न झाले होते. अपवाद वगळता आप-आपसातील घरगुती वादविवादामुळे बहुतांश वेळा सुरेखाबाई हि माहेरी (नेरी) येथेच राहत होती.यावरूनच बर्‍याचदा भावाला मेव्हण्याचा राग यायचा,त्यामुळे त्यांच्यात खटकेही उडायचे. गेल्याच आठवड्यात दोघांमधे वादही झाला होता.अखेर या वादाचे पर्यावसान बहीणीच्या कुंकु पुसण्यात झाले. बुधवार उशीरा सायंकाळी दोघांनीही जेवण घेतले. दरम्यान दोघांनी मनसोक्तपणे दारू प्यायल्याचेही सांगण्यात आले.त्यातूनच मेव्हण्याचा कायमस्वरूपी काटा काढण्याचा राक्षसी विचार त्याने (परमेश्वरने) प्रत्यक्षात आणला. पोलीस ठाण्यात स्वतःहून हजेरी लावलेल्या संशयीत आरोपीला २९ रोजी सकाळी पुन्हा पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व पथकाने त्याठिकाणी नेऊन पाहणी केली.
 
यावेळी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांनीही भेट देऊन घटनेविषयी माहिती जाणून घेतली. जामनेर पोलिसात मयताचे वडील मोतीराम नथ्यू पारधी यांच्या फिर्यादीवरून आरोपी परमेश्वर प्रकाश पारधी(आढळे)यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
 
Powered By Sangraha 9.0