आयटीआर भरण्यासाठी केंद्र सरकारकडून अंतिम मुदतीत वाढ

30 Jul 2020 12:18:01
करदात्यांसाठी मोठा दिलासा
  
नवी दिल्ली : कोरोनामुळे अनेक उद्योग आणि काम बंद असल्याने आरटीआर कसा भरावा यासंदर्भात करदात्यांसमोर अनेक प्रश्न उभे होते. इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत वाढविण्याचा निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डातर्फे (सीबीडीटी) घेण्यात आलाय. इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत यापूर्वी 31 जुलै असून आता ती 30 सप्टेंबरपर्यंत आयकर भरता येईल. त्यामुळे या निर्णयाने करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
 
income tax_1  H
 
 
आर्थिक वर्ष 2018-19 साठी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी केंद्र सरकारने 31 जुलै अंतिम मुदत देण्यात आली होती. आता यात एक महिन्याचा कालावधी मुदत वाढ देण्यात आली आहे.
 
 
यासंदर्भात 2019-20 आर्थिक वर्ष 2019-20 साठी आयटीआर अधिनियमाअंतर्गत गुंतवणुकीची मुदत 30 सप्टेंबर 2020 पर्यत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भात आयकर विभागाने माहिती दिली असून नवे आणि रिवाईज्ड इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदतीत तिसर्‍यांदा वाढ करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0