रावेर : आयशरमधून गुरांची अमानुष वाहतूक

29 Jul 2020 22:35:27
 
 
सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल; रावेर पोलिसांची धडक कारवाई
 
 
रावेर : महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेवर पोलीस तपासणीत महिंद्राची पीकअप व्हॅन आणि आयशर गाडीतून गुरांची अमानुष कोंबुन अवैध वाहतूक करणार्‍यांवर रावेर पोलिसांनी धडक कारवाई करून त्यांच्याविरुद्ध रावेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
 
 

Gure_1  H x W:  
  
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आंतरराज्जीय सीमेवरील तपासणी नाकाबंदीदरम्यान वाहने चेक करीत असताना यातील एक पांढर्‍या रंगाची महिंद्रा कंपनीची पीकअप एमपी-१२ जीए-१९१० या क्रमांकाच्या वाहनाची तपासणी करीत असताना यात गुरे कोंबून भरल्याचे आढळले. यामध्ये मुन्हा जातीचे काळ्या रंगाच्या २ म्हशी व १ गावरान म्हैस व ३ मुन्हा जातीचे पाडे (हेले) असे दिसून आले. यानंतर लागलीच याच गाडीच्या मागून आलेल्या आयशर वाहन एमपी-०९ जीएच-१५३७ या वाहनात मुन्हा जातीचे काळ्या रंगाच्या १३ म्हशी व ०७ पाडे (हेले) ही गुरे आढळून आली. ही गुरे अपुर्‍या जागेत व अमानुष पध्दतीने कोंबून वाहतूक केली जात असल्याचे चौकशीत आढळून आले. त्यांची कत्तल करण्यात येणार असल्याची माहितीसुध्दा तपासात समोर आली.
 
 
 
 
या अनुषंगाने रावेर पोलीस स्थानकात भाग ६ गु.र.नं.५९/२०२० ने विविध कलमान्वये ओमप्रकाश नवलसिंग गोलकर (रा.आरुद ता. पंधाना जि.खंडवा), शेख फिरोज शेख मजीद (रा.खंडवा विमलीपुरा), सादिक शाह हकीम शाह (रा. झोकर ता.मकसिद जि.शाजापुर, म.प्र.), रईस सईद कुरेशी (रा.आष्टा जि.सिहोर म.प्र.), नासीर समी कुरेशी (रा.आष्टा जि.सिहोर म.प्र.), साहिद रईस मनसुरी (रा.आष्टा जि.सिहोर म.प्र.), सोहेल मिन्नत कुरेशी (रा.झोकर ता.मकसिद जि.शाजापुर म.प्र.) या आरोपींविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यासोबत महेंद्रा पीकअप व्हॅन व आयशर गाडीलाही जप्त करण्यात आले. डीवायएसपी नरेंद्र पिंगळे व पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास निलेश चौधरी हे करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0