नियंत्रण रेषेवर पाकी सैनिकांचा गोळीबार

    दिनांक : 28-Jul-2020
Total Views |
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी आज मंगळवारी पुन्हा गोळीबार केला. पूंछ जिल्ह्यातील हिरानगर आणि कठाव सेक्टरमध्ये गोळीबार व तोफांचा मारा करण्यात आला. भारतीय जवानांनीही या नापाक गोळीबाराला लगेच प्रत्युत्तर दिले.
 
 

punch_1  H x W: 
 
 
पाकी सैनिकांनी सीमेवर गोळीबार करण्याचा आजचा सलग आठवा दिवस आहे. सकाळी दहापासून पाकी तोफा व बंदुका आग ओकू लागल्याने नागरिकही भयभीत झाले होते. अनेकांनी लष्कराच्या बंकर्समध्ये आश्रय घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली.