जगभरात १ कोटी रुग्णांची कोरोनावर मात

    दिनांक : 28-Jul-2020
Total Views |
वॉशिंग्टन : जगात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, दिलासादायक माहिती समोर आली आहे. औषध नसतानाही जगात काही हजार नाही तर तब्बल १ कोटी लोकांनी कोरोनावर मात केली असून ते पूर्णपणे बरे झाले आहेत.
 
 
 
America_Corona_1 &nb
 
जगातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ६६ लाखांच्या पुढे गेली आहे. त्यापैकी १ कोटीहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जगभरातील कोरोनमुक्तीची टक्केवारी ६१.१९ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तसेच, जगातील कोरोनाबळींचा आकडा साडेसहा लाखांच्या पुढे गेला असला तरी कोरोना रुग्णांचा मृत्युदर ३.९७ इतका आहे. तर, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ३४.८४ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. दरम्यान, रविवारी जगभरात २ लाख १६ हजार ३४० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर, १ लाख ३० हजार ३१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
 
 
 
जगभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १ कोटी ६६ लाख ६७ हजार ८७१ झाली आहे. यात आतापर्यंत ६ लाख ५६ हजार ९८७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण १ कोटी २ लाख ५९ हजार ६६९ रुग्णांनी कोरोनातून बरे झाले आहे. जगात सध्या कोरोनाचे ५७ लाख ५१ हजार २१५ रुग्ण सक्रिय आहेत. यापैकी ५६ लाख ८४ हजार ६३५ रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा आहे. तर, ६६ हजार ५८० रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.