राममंदिर भूमिपूजनावर ‘आयएसआय’चे सावट

    दिनांक : 28-Jul-2020
Total Views |
‘रॉ’चा इशारा
 
 
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी येथे 5 ऑगस्ट रोजी दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट पाकिस्तानची कुटील गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ने रचला आहे, अशी माहिती भारताच्या ‘रिसर्च ॲण्ड ॲनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी आज मंगळवारी दिली.
 
 
 
ISI_1  H x W: 0
 
हा हल्ला घडवण्यासाठी आयएसआयने लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांना अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण दिले, असेही रॉने स्पष्ट केले आहे. या हल्ल्यासाठी अतिरेक्यांचे तीन ते पाच गट अयोध्येत पाठवले जाणार आहेत.
हे हल्ले देशातील अतिरेक्यांनीच घडवल्याचे भासवण्याचा मनसुबा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचा आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे हे हल्ले घडवण्याचा प्रयत्न आयएसआय करणार आहे. अतिरेकी हल्ल्याची व्यापकता वाढावी यासाठी अती महत्त्वाच्या व्यक्तींना देखील लक्ष्य करण्याचा कट आयएसआयने रचला आहे. रॉने दिलेल्या इशार्‍यानंतर नवी दिल्ली, अयोध्या आणि काश्मिरातील सुरक्षा वाढवण्यात आली. या कटाची अधिक माहिती काढण्यासाठी या भागात गुप्तचरांचे जाळेही विणले गेले आहे.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी राममंदिराचे भूमिपूजन होणार आहे तसेच 2019 मध्ये याच तारखेला जम्मू-काश्मिरातील कलम 370 निष्प्रभ करण्यात आले होते. या पृष्ठभूमीवर पाकिस्तान देशात दहशतवादी हल्ले घडवण्याचा प्रयत्न करणार आहे.
https://www.tarunbharat.net//Encyc/2020/7/28/isi-to-carry-attack-in-ayodhya.html