राफेलची पहिली तुकडी बुधवारी भारतात धडकणार

27 Jul 2020 18:17:42
 
 
नवी दिल्ली : बहुप्रतिक्षीत आणि बहुप्रतीक्षित राफेल विमानांची पहिली तुकडी फ्रान्सहून भारतात येण्यासाठी सज्ज आहे. या तुकडीत ५ विमानांचा समावेश असून लवकरच या विमानांचा भारतीय हवाई दलामध्ये समावेश करण्यात येणार आहे.
 
 
 
Rafael_1  H x W
 
ही विमाने बुधवार रोजी भारतात लँडिंग करणार असून हरयाणातील अंबाला येथे ही विमाने उतरणार आहेत. तसेच २०१६ मध्ये भारताने फ्रान्सबरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदीचा ५९ हजार कोटींचा करार केला आहे. राफेल फायटर विमानांच्या पहिल्या तुकडीने फ्रान्सहून उड्डाण केले आहे. राफेल फायटर जेटच्या हाताळणीकरीता भारतीय हवाई दलाचे १२ वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात केले आहेत. हरयाणामधील अंबाला एअर फोर्स स्टेशन येथे राफेल विमानांचा तळ असेल. उड्डाणवस्थेत असतानाच या विमानांमध्ये इंधन भरण्यात येईल.
 
 
दरम्यान, २० ऑगस्टला पारंपारिकरित्या सोहळा आयोजित करण्यात येणार असून या फायटर विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश होणार असल्याची शक्यता आहे. येथेे येण्यापूर्वी ही विमाने यूएईत फ्रेंच तळावर लँडींग करणार आहेत. राफेलचे पहिले स्क्वाड्रन अंबाला एअर बेसवर तर दुसरे स्क्वाड्रन पश्चिम बंगाल हाशिमारा येथे असेल.
Powered By Sangraha 9.0