भाजपा ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी आ.सुरेश भोळे

27 Jul 2020 15:45:27
 
mla bhole_1  H
 
जळगाव, २७ जुलै
भारतीय जनता पार्टीच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी शहराचे आ.सुरेश दामू भोळे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आ.भोळेंची ही नियुक्ती केली असून या नव्या जबाबदारीबद्दल त्यांचे अभिनंदनही केले आहे.
 
भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपद तत्कालीन अध्यक्ष हरिभाऊ जावळे यांच्या निधनामुळे रिक्त होते. त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी २६ जुलै रोजी आ.सुरेश भोळे यांची ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
 
गेली अनेक वर्षे आ.भोळे राजकीय क्षेत्रात सक्रियपणे कार्य करीत आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठीही ते परिश्रम घेत आहेत. आ.भोळे ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वासही आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला आहे.
 
आ.भोळे यांच्या या नियुक्तीबद्दल माजी मंत्री आ.गिरीश महाजन, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री ऍड. किशोर काळकर, खा.उन्मेश पाटील, खा.रक्षाताई खडसे, ‘बेटी बचाव बेटी पढाव’चे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, माजी आ. स्मिताताई वाघ, आ. चंदूभाई पटेल, माजी आ.गुरुमुख जगवाणी, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, भाजपाचे मनपातील गटनेते भगत बालाणी, स्थायी सभापती ऍड. शुुचिता हाडा, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, डॉ.राधेश्याम चौधरी, नितीन इंगळे आदींनी अभिनंदन केले.
Powered By Sangraha 9.0