सावखेडा सिम येथील तरुणाचावरी धरणात बुडून मृत्यू

26 Jul 2020 20:02:15

dahigaon_1  H x 
मोठा भाऊ सुदैवाने बचावला
दहिगाव ता. यावल : येथून जवळच असलेल्या सावखेडा येथील खाटीक कुटुंबातील २३ वर्षीय तरुणाचा वरी धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.
 
मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. हिरोज खाटीक वय २३ व त्याचा मोठा भाऊ मोहसीन खाटीक हे दोघं दुपारी तीन वाजेच्या सुमारास वरी धरणावर पोहण्यासाठी गेले असता, ते धरणात बुडत असताना यातील मोठ्या भावाला मोहसीन याला परसाडे येथील तरुणांनी वाचविले. यात ते यशस्वी झाले. तर लहान भाऊ हिरोज याचा हात सुटल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबतचे वृत्त कळताच सावखेडा येथील पंचायत समिती सदस्य शेखर पाटील, अतुल भालेराव पोलीस पाटील, बशीर तडवी, यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. मयताच्या आई-वडिलांची परिस्थिती नाजूक असून मयत यावल येथील कला वाणिज्य महाविद्यालयातील टीवायबीएच्या वर्गात होता.
 
 
Powered By Sangraha 9.0