बोदवडला महिन्याभरापासून पावसाची दांडी

26 Jul 2020 19:45:37
 
bodavad_1  H x
 
 
 
पावसाची प्रतिक्षा, शेतकरी दुहेरी संकटात
 
 बोदवड : जळगाव जिल्ह्यातील सर्वत्रच पाऊस सुरू असून मात्र बोदवड परिसर पावसापासून वंचित आहे. मागील महिन्यात ढगफुटी झाली. त्यातील सुरवाडे, मानमोडी या गावातील बर्‍याच शेतकरी यांचे पिक जमिन दोस्त झाले. नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे सुद्धा झाले पण शासनाची मदत मिळेलच याचा भरवसा नाही. तालुक्यात तीनदा पेरणी झाली आहे. दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस आतापर्यंत झाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
 
दुसरीकडे शहरात रासायनिक खतांचा तुटवडा असून शेतकर्‍यांना जे खत पाहीजे ती खते वेळेवर मिळत नाही. खतासाठी कृषी विभाग कोणत्याही उपाय योजना करीत नाही. तालुक्यात तीन सर्कल असून एकाही सर्कलमध्ये समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे याहीवर्षी दुष्काळ पडतो की काय? अशी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.
Powered By Sangraha 9.0