भूमिपूजनासाठी अयोध्येत तयारीसाठी सज्ज

    दिनांक : 26-Jul-2020
Total Views |
 
 
नवी दिल्ली, शनिवार रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी अयोध्येला भेट देत अयोध्येतील सर्व मंदिरांची साफसफाई करीत 4 ते 5 ऑगस्टला प्रत्येक ठिकाणी दिव्यांची आरास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


MANDIR_1  H x W
 
 
राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर येत्या 4 ते 5 ऑगस्टला भूमिपूजनासाठी अयोध्येतील मंदिरे उघडझ्यात येणार आहे. या दिवशी दिवाळीसारखी साजरी करण्यात येत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 5 ऑगस्टला राम मंदिराचा भूमिपूजनचा सोहळा पार पडेल. त्यासाठी आतापासून अयोध्येमध्ये जोरदार तयारीस सुरुवात झाली आहे.
 
 
मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी यासंदर्भात शनिवार रोजी आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी विश्व हिंदू परिषदेत झालेल्या बैठकीत राम मंदिर ट्रस्ट आणि साधु-संतांशी संवाद साधला. यावेळी योगी आदित्यनाथ म्हणतात की, 500 वर्षांच्या संघर्षानंतर हा शुभ दिन आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठ्याने स्वागत करण्यात येणार आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.