साध्वी प्रज्ञा ठाकूर : पाच वेळा हनुमान चालीसा म्हणा, कोरोना संपेल

    दिनांक : 26-Jul-2020
Total Views |
भोपाळ - भाजपाच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर सध्या त्यांच्या व्यक्तव्यांमुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यांनी सांगितले की, कोरोनावर मात करायची असेल तर पाच वेळा हनुमान चालीसाचे वाचन करा, असा मंत्र प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी ट्विट करीत सूचविला.


MP SING_1  H x
 
प्रज्ञा सिंग ठाकूर ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर आपल्याला करोना महामारी संपुष्टात आणायची असेल तर लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण एक आध्यात्मिक प्रयत्न करायला पाहिजे. 25 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान, दररोज सायंकाळी 7 वाजता घरात हनुमान चालिसेचे वाचन करा, आणि  येत्या 5 ऑगस्टला राम मंदिरात आरती झाल्यानंतर आपापल्या घरी दिवे  लावून समारोप करूया.