कंटेनरने उडविली ५० हूनअधिक वाहने

26 Jul 2020 18:14:46
मद्यधुंद चालकासह कंटेनर ताब्यात, गुन्हा दाखल
 
track_1  H x W: 
 
जळगाव, २६ जुलै
तालुक्यातील नेरीपासून ते जळगाव येथील रेल्वे स्टेशनदरम्यान भरधाव कंटेनरने सुमारे ५० हूनअधिक वाहने उडवल्याचा थरारक प्रकार रविवारी दुपारी घडला. मद्यधुंद चालकासह कंटेनरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
मलकापूरमध्ये कंटेनर (एमएच २३ ए यु) चालक भाऊसाहेब रावसाहेब खांडवे (३९,रा. कर्हे वडगाव ता. आष्टी जि. बीड) हा केमिकल खाली करून मुंबईकडे जात होता. यादरम्यान खोडवेचा कंटेनरीला ताबा सुटल्याने नेरी येथे काही वाहनांना कंटेनरने उडविले. त्याअपघात अनेकजण जखमी झाले आहेत. त्यातील काही वाहनचालक मागे येत असल्याच्या भीतीने कंटेनर चालकाने कंटेनर भरधाव वेगाने पळविला. मद्याच्या नशेत असलेल्या खांडवे याने रस्त्यातील तसेच शहरातील अनेक वाहने उडविली.
 
 
कामावरुन घरी जाणार्‍या राजू गोविंदा चव्हाण यांच्या दुचाकीला (क्रमांक एमएच १९ डीसी ८१४६) यांना मागून भरधाव वेगाने येणार्‍या कंटेनरने धडक दिली. हा अपघात शहरातील काशिनाथ चौफुलीवर घटला.धकडेत दुचाकीवरून खाली पडले. त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
 
कंटनेर शहरात आल्यानंतर अजिंठा चौफुली, चित्रा चौक, टॉवर चौक मार्गे हा कंटेनर रेल्वे स्टेशनच्या समोर थांबला. त्याच्या मागावर असलेल्या नागरिकांनी चालकास चोप दिला. प्रकाराची माहिती मिळाल्यावर टॉवर चौकात बंदोबस्तावर असलेले शहर पोलीस ठाण्याचे गणेश शिरसाळे, अक्रम शेख रतन गिते, सुधीर साळवे, संजय झाल्टे यांनी कंटेनरचालक भाऊसाहेब खांडवे यास ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर कंटेनर आणि चालकास पुढील कार्यवाही एमआयडीसी पोलिसांकडे सोपविण्यात आले. या अपघातील जखमी राजु गोविंद चव्हाण (रा.कुसुंबा) याच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नाईक पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र गायकवाड करीत आहे.
Powered By Sangraha 9.0