धावपटू हिमा दासने सुवर्णपदक केले ‘कोरोना वॉरियर्स’ यांना समर्पित

26 Jul 2020 20:12:52
 
 
नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये झाली होती. या स्पर्धेत भारताने १६ सुवर्ण, २३ रौप्य आणि ३१ कांस्यपदकांची कमाई केली होती. स्पर्धेत ४ बाय ४०० या रीले प्रकारात भारताने रौप्यपदक पटकावले होते. संघात धावपटू हिमा दासचाही सहभाग होता. यावेळी हिमाबरोबर भारतीय संघात मोहम्मद अनास, पुवम्मा आणि अरोकिया राजीव यांचा समावेश होता. स्पर्धेत बेहरिनने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. संघातील केमी अँडेकोया ही उत्तेजन सेवन चाचणीमध्ये दोषी आढळल्याने आता बेहरिनचे सुवर्णपदक काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे भारताच्या रौप्यपदकाचे रुपांतर आता सुवर्णपदकामध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे आता या चारही भारताच्या धावपटूंना सुवर्णपदक दिले जाणार आहे. हिमाने हे सुवर्णपदक आता ’कोरोना वॉरियर्स’ना समर्पित केले असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
 
Hima Das_1  H x
 
 
दरम्यान कोरोनादरम्यान ही भारताला सुवर्णपदक मिळाले होते. त्यानंतर भारताची धावपटू हिमा दास हीने देशभक्तीचा नजारा पेश करत आपले हे सुवर्णपदक ’कोरोना वॉरियर्स’ना समर्पित केले आहे. हे सुवर्णपदक मी कोरोना वॉरियर्स यांना समर्पित केले आहे. सध्या पोलिस, डॉक्टर्स आणि अन्य ’कोरोना वॉरियर्स’ हे मोलाचे काम करत आहेत.
 
"काही दिवसांपूर्वीच मला आशिया चषक स्पर्धेचे ४ बाय ४०० मीटर मिक्स रिले स्पर्धेचे सुवर्णपदक मिळाले होते. हे सुवर्णपदक मी 'कोरोना वॉरियर्स'ना समर्पित केले आहे. कारण सध्या पोलिस, डॉक्टर्स आणि अन्य 'कोरोना वॉरियर्स' हे मोलाचे काम करत आहेत. कोरोनाच्या काळात लोकांना सुरक्षित कसे ठेवता येईल, हे 'कोरोना वॉरियर्स' पाहत आहेत. त्यामुळे हे सुवर्णपदक मी 'कोरोना वॉरियर्स'ना समर्पित करत आहे.", असे हिमाने एक ट्विट करून सांगितले आहे. 
 
Powered By Sangraha 9.0