4 भाषेत जिओचे शैक्षणिक चॅनेला प्रारंभ

    दिनांक : 26-Jul-2020
Total Views |
जिओ धारकांसाठी कंपनीने लवकरच नवनविन सुविधा करण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शाळा बंदी असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, त्यांचे नुकसान भरूनण काढण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध मार्गांचा विचार केला जातोय. त्यासाठी एक मार्ग म्हणजेच जिओ टीव्ही. इयत्ता 3 री ते इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी जिओ टीव्हीने 12 शैक्षणिक चॅनेल सुरू केलेत.
 
 
JIO_1  H x W: 0
 
 
ह्या जिओ टिव्ही चॅनेल मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या 4 भाषेत उपलब्ध होणार आहेत. तसेच 1 ली ते 10 वी मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी 4 युट्यूब चॅनेल सुरु केल्या आहेत. जिओ सिम धारकांना ज्ञानगंगा या नावाने हे चॅनेल उपलब्ध करून देण्यात आले आहे.
 
 
त्यासाठी जिओ टी.व्ही या अ‍ॅपवर कॅटेगरीमधून एज्युकेशनल (Educational) पर्याय निवडावा आणि वरील चॅनेल आपल्याला हव्या त्या भाषेत पाहण्यासाठी निवडावे. तसेच https://jiochat.com/channel/600000000955/1 या संकेतस्थळावर जावून भेट द्यावी.