पाचोर्‍यात कडकडीत बंद

25 Jul 2020 20:13:20

Corona _1  H x  
पहिल्याच दिवशी प्रशासनातर्फे कडक अंमलबजावणी
पाचोरा : पाचोरा, भडगाव तालुक्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पहाता ही साखळी पुन्हा एकदा तोडण्यासाठी २५ ते ३१ जुलै पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लॉकडाउन झाले आहे. आज शनिवारी पहिल्याच दिवशी पाचोरा शहरासह सर्वत्र इमर्जन्सी सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे चित्र दिसून आले.
 
प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे,यांच्या नेतृत्वाखाली कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक चौकात पोलीस पथक नियुक्त करण्यात आले असून कर्मचारी ही वाहन चालकांविरुद्ध कारवाई करतांना दिसून आले. कृष्णापुरी चौफुली, जारगाव चौफुली, महाराणा प्रताप चौक, शिवाजी महाराज चौक आदी ठिकाणी पोलिस कारवाई करत होती. सर्वत्र शुकशुकाट होता. कारवाईच्या धाकाने कुणीच बाहेर न निघता घरीच थांबून असतानाचे चित्र दिसून आले. महसूल प्रशासन पोलीस प्रशासन, नगर परिषद प्रशासन यांच्यातर्फे चोख अंमलबजावणी करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0