चिंचपुरे येथे बंधारा फुटला

25 Jul 2020 21:22:41

pachora_1  H x  
 
पुराच्या पाण्याने घरे गेली वाहून,
आ.किशोर पाटील, प्रांताधिकारी यांची घटनास्थळी पाहणी
पाचोरा : पाचोरा तालुक्यातील चिंचपुरे ता.पाचोरा येथे बहुळा नदीच्या उगमस्थानी झालेल्या पावसामुळे रात्री ८:३० ते ९ वाजता अचानक आलेल्या पुरात नदी शेजारी असलेल्या घर मालक शिवाजी माधवराव पाटील यांचे घरात भाडेकरू म्हणून राहत असलेल्या राजेंद्र पाटील यांचे
मातीचे घर वाहून गेले. चिंचपुरे गावालगत असलेला के.टी.वेअर बंधारा फुटल्याने यात घरातील सर्वच संसार उपयोगी वस्तू या पुराच्या पाण्यातून वाहून गेल्या आहेत.
 
काही धान्य देखील वाहून गेले. परंतू सुदैवाने घरातील सर्व सदस्य सुखरूप आहेत. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढल्याने जीवीतहानी टळली. गावालगत असणार्‍या के.टी.वेअर बंधार्‍याची आडवी भिंत फुटल्याने पाण्याचा प्रवाह दुसर्‍या बाजूने प्रवाहित झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. यात अनेकांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती पाचोरा-भडगाव विधानसभाचे आमदार किशोर पाटील व प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी नुकसान ग्रस्त ग्रामस्थांनी व्यथा मांडली.शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली.
 
 
Powered By Sangraha 9.0