‘वॉरिअर आजी’ला रितेशचा मदतीचा हात!

    दिनांक : 25-Jul-2020
Total Views |
 
 
लॉकडाऊमध्ये अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. कारण अनेकांच्या नोकर्‍या गेल्यात तर कुणाचे व्यवसाय बंद झालेत, तर कुणाला वेतन कपातीचा फटका बसला. हातावर पोट असलेल्यांचे तर अधिक हाल आहेत. त्यामुळे पोट भरण्यासाठी रस्त्यावर कसरतीचे खेळ करणार्‍या ८५ वर्षीय शांताबाई पवार या आजीबाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अभिनेता रितेश देशमुखने त्यात तिच्या पत्त्यासह तिला मदत करण्याचे आवाहन केले आहे.
 
 
काय आहे व्हिडिओत
 
 
रितेशच्या या व्हिडिओत ही महिला लाठीकाठी खेळताना दिसते. लॉकडाऊनमुळे मुंबईतील अशा अनेक परप्रांतीय मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी आपल्या गावाची वाट धरली होती. त्यावेळी अभिनेता सोनू सूद त्यांच्या मदतीला धावला होता. तसाच आता रितेश धावला आहे.
 
 
वयाच्या ८ व्या वर्षापासून खेळताहेत ढालपट्टा
 
retesh deshmukh_1 &n
 
 
 
लाठ्याकाठ्यांचा खेळ खेळून पोटाची खळगी भरणार्‍या शांताबाई पवार यांच्या या व्हिडीओने भल्याभल्यांना अचंबित केले आहे. त्यांच्या टॅलेंटने त्या सोशल मीडियावर स्टार झाल्या आहेत. त्यांनी वयाच्या ८ व्या वर्षापासून ढालपट्टा खेळण्यास सुरुवात केली होती. या काळात ‘सीता और गीता’ सिनेमात ’अनाडी है कोई, खिलाडी है कोई’ या गीतात हेमा मालिनी यांच्या ‘डमी’ म्हणून त्या डोंबारीणसुध्दा बनल्या होत्या. याशिवाय ‘त्रिदेव’सह एका मराठी चित्रपटातही त्यांनी अशीच कसरतीची कामे केली आहेत.
 
 
अनाथ मुलांचा सांभाळ
 
 
उघड्यावर पडलेल्या अनाथ मुलांसाठी काहीतरी करण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी दहा अनाथ मुलींचा सांभाळ केला असून त्यातील तीन मुलींचा विवाह करून त्यांना सासरी पाठवले आहे. कोरोनाची भीती होती. मात्र, फिकीर न करता घर चालवण्यासाठी मी या काळातही बाहेर पडले, असे या बहाद्दर आजीबाईचे म्हणणे आहे.
 
 
पुणे आयुक्तांकडून कौतुक
 
 
शांताबाई पवार यांच्या या टॅलेंटचं पुण्याच्या आयुक्तांनी देखील कौतुक केले. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी त्यांचा व्हिडीओ ट्विट करीत ‘टॅलेंट ला कोणत्याही सीमा नसतात’, असे म्हटले आहे.