केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर

    दिनांक : 25-Jul-2020
Total Views |
 
 
आता बाईकवर मागच्या प्रवाशासाठीही हॅण्डल सक्तीचे
 
 
bike_1  H x W:
 
 
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून दुचाकींसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली. आता बाईकवर मागे बसणा़र्‍या प्रवाशासाठी हॅन्डल लावावे लागेल. यात सहप्रवाशाच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. बाईकवर असलेल्या मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीसाठी हॅण्डल असणे सक्तीचे करण्यात आले आहे. परंतु अनेक बाईक्समध्ये अशा पद्धतीची सुविधा नसल्याने आता भविष्यात बाईक्समध्ये अशा सुविधा कंपन्यांना द्याव्या लागणार आहेत.
 
असे नियमावलीत आहेत नियम -
 
 
- बाईकवर दोन्ही बाजूस पाय ठेवण्यासाठी पायदान अनिवार्य.
- मागे बसणार्‍या व्यक्तीचे कपडे चाकात अडकू नये म्हणून मागील टायरचा अर्धा भाग सुरक्षितपणे झाकलेला असावा.
- बाईकमध्ये हलका कंटेनर लावण्यात यावे. त्याची लांबी ५५० मि.मी., रुंदी ५१० मि.मी. आणि उंची ५०० मिमीहून अधिक नसावी. - सीटच्या मागच्या बाजूस कंटेनर लावावा.
- बाईक चालवण्याची परवानगी केवळ चालकास.