मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अमिताभ बच्चन कोरोना व्हायरसशी सामना करत रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच जया बच्चन यांनाही सध्या क्वारंटाईन करण्यात आले आहे. मध्यरात्री जया बच्चन यांच्या घराच्या परिसरातील काही बाईकस्वार जोरजोरात आवाज करीत बाईक चालवितात. बाईकच्या आवाजामुळे जया बच्चन यांची झोपच उडाली आहे. त्यामुळे जया बच्चन यांना मुंबई पोलिसांना पाचारण करावे लागले.
मुंबई पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारावरून बाईकचे नंबर शोधून काढले असून या बाईकस्वारांचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस म्हणाले की, अमिताभ बच्चन आधीच कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे जया बच्चन खूपच तणावात आहेत. त्यातच या बाईकस्वारांच्या त्रासामुळे त्यात आणखीन वाढला आहे. लॉकडाऊन तसेच निर्जन रस्त्यावर ही मुली रात्रीच्या वेळी बाईकच्या शर्यती लावतात. जलसा बंगल्याच्या आसपास रस्त्यावरील कॅमेरांच्या फुटेज मिळाल्यामुळे या तरुणांना लवकरच अटक करणार आहोत.