कोरोनावरील सर्वात स्वस्त औषध फॅव्हिपिरावीर भारतात ‘लॉंच’

    दिनांक : 25-Jul-2020
Total Views |
 
 
नवी दिल्ली : संपूर्ण जगासह भारतातही कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभिूमवर जगातील सर्व देश प्रयत्न करीत आहेत. सर्वांना परवडेल अशा स्वस्त दरात औषध उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न भारताने केला आहे. भारताने आणखी एक स्वस्त कोरोनावरील औषध नुकतेच लॉंच केले आहे. हे औषध जेनबर्कट फार्मास्यूटिकल्स या औषध कंपनीने बनवले असून त्याचे नाव फॅव्हिवेंट असून बाजारात फॅव्हिपिरावीर या नावाने विक्री होत आहे.
 
 

Favipiravir_1   
 
 
जेनबर्कट फार्मास्यूटिकल्सने सांगितल्यानुसार या औषधाच्या टॅबलेटची किंमत फक्त ३९ रुपये असणार आहे. हे औषध कोरोनाची हलके व मध्यम लक्षणे असणार्‍या रुग्णांना दिले जाणार आहे. फॅव्हिवेंटची टॅबलेट २०० मिलिग्रॅममध्ये उपलब्ध आहे. एका पाकिटात १० टॅबलेटस् असणार आहे. या औषधाची तेलंगानाच्या एका फार्मास्युटिकल प्लांटमध्ये निर्मिती केली जाणार आहे.
 
 
 
यापूर्वी फार्मा कंपनी ब्रिंटन फार्मास्युटिकल्सने सांगितले की, कंपनी फॅव्हिटॉन नावाने फॅव्हिपिरावीर औषध ५९ रुपये प्रति टॅबलेटने विक्री करीत आहे. तसेच फार्मा कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स आधीपासून फॅबिफ्लू नावाने ७५ रुपये प्रति टॅबलेटने हे औषध बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले आहे.