कैद्यांच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना

25 Jul 2020 15:07:34
पोलीस अधीक्षक, पालकमंत्र्यांकडून कारागृहास भेट

aropi_1  H x W: 
 
जळगाव, २५ जुलै
येथील जिल्हा कारागृहातून शनिवारी सकाळी ७.३० वाजता तीन कैद्यांनी बंदुकीचा धाव दाखवून मुख्य प्रवेशद्वारातून पलायन केल्याची घटना घडली. या घटनेमुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कारागृह भेट दिली असून फरार आरोपींना काही तासातच ताब्यात घेण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
 
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा कारागृहात सकाळी तीन कैद्यांनी पलायन केल्याने खळबळ उडाली आहे. सुशील अशोक मगरे (पहूर, ता.जामनेर), गोरव विजय पाटील रा.तांबापुरा, अमळनेर), सागर संजय पाटील (पैलाड अमळनेर) असे पळालेल्या आरोपींची नावे आहेत. सुशील मगरे हा पोलीस दलातून बडतर्फ झालेला आहे. पुणे येथील सराफ दुकानावर शस्त्रांचा धाक दाखवून त्याने दरोडा टाकला होता. गेल्या दोन महिन्यात ही दुसरी घटना आहे.
 
 
कैदी फरार झाल्याची माहिती मिळतात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापूराव रोहम तसेच जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अकबर पटेल यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले आहे. याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
 

gulab_1  H x W: 
 
कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी
यापूर्वी देखील जिल्हा कारागृहातून कैदी फरार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पुन्हा शनिवारी कैदी फरार झाल्याने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कारागृहात भेट दिली. जिल्हा कारागृहात तटबंदीची आवश्यकता आहे. २०० कैद्यांची क्षमता असलेल्या कारागृहात सध्या ४०० कैदी आहेत. त्यामाने येथील पोलीस कर्मचार्‍यांचा तुटवडा असून अधिकारी नियमीत नाही. तसेच येथील अनेक सीसीटीव्ही कॅमेरेदेखील बंद अवस्थेत असल्याचे पालकमंत्र्यांच्या निर्देशनास आले. त्यामुळे तात्पूत्या स्वरुपात काही सुविधा उपलब्ध करता येतील का, याबाबत लवकर निर्णय घेण्यात येईल. तसेच कारागृह वस्ती नसलेल्या ठिकाणी हलविण्याबाबतसुद्धा चर्चा सुरु आहे. पोलिसांचे पथक आरोपींच्या शोधार्थ रवाना झाले असून काही तासातच आरोपींना ताब्यात घेण्यात येईल, अशीही पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी शेवटी सांगितले.
 

aropi sdf_1  H
 
पोलिसांकडून आवाहन
दरम्यान, जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून तिघं फरार आरोपींचे छायाचित्रे जारी केले आहे. कैद्यांना मदत करणारा जगदिश पुंडलिक पाटील (रा.पिंपळकोठा, ता.पारोळा) हा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला असून पोलीस पथक शोधार्थ रवाना झाले आहे.
Powered By Sangraha 9.0