नंदुरबार जिल्हा शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाभर पोस्टर आंदोलन

22 Jul 2020 18:17:16
धडगाव/नंदुरबार : १० जुलै २०२० रोजी शालेय शिक्षण विभागाने जारी केलेली अधिसूचना रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी नंदुरबार जिल्हा शिक्षक भारतीच्या वतीने बुधवार दिनांक २२ जुलै २०२० रोजी एक दिवसाचे राज्यव्यापी पोस्टर आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
 

NBR_Shikshak Bharti_1&nbs 
 
आज जिल्हा परिषदेच्या आवारात पोस्टर आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षणमंत्री यांना शिक्षणाधिकारी द्वारा निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन मिळण्याचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली १९८१ मधील मसुद्यात बदल सुचवणारी अधिसूचना रद्द करावी, तसेच १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार विनाअनुदानित शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार अनुदान दयावे. शिक्षकांवर अन्यायकारक अधिसूचना रद्द करण्यात यावी,यासाठी विधान परिषद नियम २४० अन्वये अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण श्रीमती वंदना कृष्णा आणि उपसचिव श्रीमती चारुशीला चौधरी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आमदार कपिल पाटील यांनी दाखल केला आहे. १० जुलै २०२० रोजीच्या अधिसूचनेवर प्रत्येक कर्मचार्‍याचा लेखी आक्षेप कुरिअरने अथवा पोस्टाने १० ऑगस्टपूर्वी मंत्रालयात पाठविण्यात येणार आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या हक्कावर घाला घालणारे निर्णय घेणार्‍या शिक्षण विभागातील अधिकार्‍यांना घरी बसवण्यासाठी आंदोलकांनी पोस्टर झळकवत मागणी केली. ही अन्यायकारक अधिसूचना रद्द होऊन प्रचलित सूत्रानुसार अनुदान वितरीत होईपर्यंत आणि जुनी पेन्शन योजना लागू पर्यंत आंदोलनाचा लढा सुरू ठेवणार असल्याचे पदाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर परत शिक्षक भारती मोठ्या ताकदीने आंदोलन करेल, असे शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष राहुल अशोकराव पाटील यांनी यावेळी सांगितले.
 
 
शिक्षणाधिकारी नंदुरबार यांना मागण्यांचे निवेदन देण्यासाठी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष राहुल अशोकराव पाटील. उर्दू विभागाचे अध्यक्ष शेख इकबाल उमर,कार्याध्यक्ष आशिष दातीर, उपाध्यक्ष राजेश जाधव,सय्यद इसरार, कार्यवाह सतीश मंगळे, कार्यवाह महेश नांद्रे, सहकार्यवाह पुष्कर सुर्यवंशी. संघटक दिनेश पवार, तालुकाध्यक्ष जी एम पाटील, संजय के.पाटील, राहुल मोरे, संदीप जाधव, सचिन जळोदकर, ईश्वर चौधरी आदी उपस्थित होते.
 
Powered By Sangraha 9.0