धरणगाव तालुक्यात नवे १९ कोरोनाबाधित

22 Jul 2020 22:22:52
 

Corona_1  H x W 
 
धरणगाव : धरणगाव कोवीड केअर सेंटरला बुधवारी दुपारी प्राप्त अहवालानुसार तालुक्यात पुन्हा १९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात रेल ५, पिंप्री आणि वराड बुद्रुक प्रत्येकी ३ तर साळवा २, सर्वे खुर्द , निशाणे बुद्रुक, मुसळी, आनोरा, बांभोरी प्र.चा.आणि पाळधी खुर्द प्रत्येकी एकाच समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे. तालुक्यातील एकुण रूग्ण संख्या आता ३८३ झाली आहे. तर साधारण ९९ रुग्ण कोविड सेंटरला उपचार घेत आहेत. तसेच आतापर्यंत साधारण २६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर २३ जण मयत झाले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0