चाळीसगाव पालिकेचा वनवास अखेर संपला

21 Jul 2020 22:45:42

CHL_Unmesh_1  H
 
 
खा.उन्मेश पाटील यांच्या दणक्याचा परिणाम
नवीन मुख्याधिकारी नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी यांना शासनाचे पत्र
चाळीसगाव : नगरोत्थान योजनेत ९० कोटी,१५० कोटींच्या महत्वाकांक्षी भुयारी गटार योजनेतील पहिल्या टप्प्यातील ७० कोटी, २२ कोटींचा घनकचरा प्रकल्प याच बरोबर कोट्यावधी रुपयांची शहर सुशोभीकरण, एलइडी विद्युत दिवे योजना अशा अनेक योजनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मोठा निधी आणून शहराच्या विकासाला गती देण्याचे काम सुरू असतांना गेल्या बारा महिन्यापासून चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने शहरवासीयांची कामे खोळंबली होती. विकास कामांची गती मंदावली होती .यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. यासाठी खा.उन्मेश पाटील यांनी नगरसचिवांना भेटून २४ तासात मुख्याधिकारी नेमणूक न झाल्यास मंत्रालयाच्या पायरीवर उपोषणाचा इशारा दिला. या दणक्याने यंत्रणा खडबडून जागी झाल्याने चाळीसगाव पालिकेचा वनवास अखेर संपला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयास नवीन मुख्याधिकारी नियुक्तीबाबत आदेश प्राप्त झाले असून पालिकेला मुख्याधिकारी मिळत असल्याने शहरवासीयांमध्ये खा. उन्मेश पाटील यांच्या भूमिकेचे कौतूक होत आहे..
खासदारांच्या दणक्याने अखेर वनवास संपला
नगरपरिषद अंतर्गत गेल्या काही वर्षात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या नगरोत्थान योजनेतील ९० कोटीचा निधी आणून शहराच्या विकासात भर घातली, दीडशे कोटी रुपयाची महात्वकांक्षी भुयारी गटार योजना यातील ७० कोटी रुपये नगरपालिकेला मिळून कामाला सुरुवात झाली. घनकचरा प्रकल्पासाठी २२ कोटी रुपये तसेच कोट्यावधी रुपयाची एलईडी योजना गतिमान करून शहरवासीयांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मेहनत घेतली होती. मात्र गेल्या वर्षभरापासून मुख्याधिकारी नसल्याने ही कामे खोळंबली आहेत. तसेच नागरिकांचा रोष देखील वाढत असल्यााने नगर विकास सचिव पाठक यांच्या दालनात त्यांची भेट घेऊन २४ तासांत मुख्याधिकार्‍यांची नेमणूक न झाल्यास मंत्रालयाच्या पायरीवर उपोषणाचा इशारा दिला होता. या अनुषंगाने नवीन मुख्याधिकारी नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी यांना शासनाचे पत्र प्राप्त झाल्याने पालिकेला लवकरच नवीन मुख्याधिकारी नियुक्ती करण्यात येणार आहे.खा.उन्मेश पाटील यांनी खंबीर पवित्रा घेतल्याने शासन खडबडून जागे झाले. पालिकेला मुख्याधिकारी नेमणुकीसाठी खा.उन्मेश पाटील यांनी घेतलेल्या खंबीर भूमिकेचे शहरवासीयांकडून जोरदार स्वागत होत आहे.
Powered By Sangraha 9.0