टेस्टी ‘रबड़ी गुलाबजाम’

    दिनांक : 20-Jul-2020
Total Views |
 
 
आपल्यासाठी नेहमीच बनवण्याचे आणि खाण्याचे नवनवे प्रयोग करून आपल्यासमोर चांगल्या आणि टेस्टी रेसिपी आणत असतो. आजही एक झक्कास आणि टेस्टी रेसिपी आपल्यासाठी आणली आहे- ती आहे ‘रबड़ी गुलाबजाम’. हे बनवण्यासाठी वेळही कमी लागतो आणि गुलाबजाम पण टेस्टी होतात.
 
 
GULABJAMUN_1  H
 
 
साहित्य -
1/2 ली. दूध, 3/4 टेबल स्पून साखर, 1 टेबल स्पून मिल्क पावडर, 1/2 टि स्पून वेलची पावडर, 4/5 काड्या केशर
गुलाबजामसाठी - 1 किलो मावा, 1 टि स्पून साखर, 1 टेबल स्पून आरारोट, 1 टि स्पून वेलचीचे दाणे (आख्खे), 1 टि स्पून बारीक रवा, तळण्यासाठी तूप.
 
 
कृती-
* मावा छान मळून घ्यावा म्हणजे चांगल्या प्रकारे एकजीव होते.
* त्यात आरारोट, थोड़ा रवा, वेलचीचे दाणे घालून मिक्स करा.
* त्याचे छोटे-छोटे गोळे करुन कढ़ईत तूप गरम करुन मंद आचेवर तळून घ्या.
* आता एका पॅनमध्ये दूध आटवून घ्या. त्यात मिल्क पावडर, केशर, विलायची, साखर (आवश्यकतेनुसार) घालून दूध छान घट्ट करुन घ्या.
* थोडं गार झाल्यावर तळलेले गुलाबजाम घाला. थोडावेळ मुरु द्या.
* थंडगार करुन रबड़ी गुलाब जाम खाण्यास तय्यार.