जि.प.च्या बांधकाम विभागातशॉर्ट सर्कीटमुळे आग

02 Jul 2020 19:38:57

zp _1  H x W: 0 
 
 
जळगाव : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात शॉर्ट सकीॅटमुळे महत्वाची काही कागदपत्रे जळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शॉर्ट सर्किटमुळे काही कॉम्प्यूटरमधील डाटा नष्ट होण्याची भिती व्यक्त होत आहे. एक कॉम्प्यूटर , दोन बॅटर्‍या, एक टेबल जळाल्याचे जि.प.च्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हा परिषदेत उपलब्ध असलेल्या अग्नीशामक यंत्राच्या सहायाने या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याचे जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0