तळोद्यात सव्वाचार कोटींच्या कामांचे भूमिपूजन

19 Jul 2020 19:34:24
 
नगरोत्थान अभियान, फुटपाथ, गटारी, दुभाजकाच्या कामासाठी दोन कोटी
 
 
तळोदा : येथील नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नगरोत्थान अभियानांतर्गत एकूण ४ कोटी २६ लाख रुपयांचा रस्ते, दुभाजक, फुटपाथ, गटारी अश्या विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ६० दात्यांनी रक्तदान केले.
 
 
 
Taloda_Bhumipujan_1 
 
महाराष्ट्र नगरोत्थान अभियानांतर्गत चिनोदा चौफुली ते बिरसा मुंडा चौकपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण, फुटपाथ, गटारी, दुभाजकाचा कामासाठी २ कोटी ५ लाख, देशपांडे फोटो स्टुडिओ ते बस स्टँडपर्यंत रस्ता कामासाठी ७० लाख, बडरी कॉलनीत स्त्याचे डांबरीकरण व गटारीसाठी ७५ लाख, हातोडा नाका ते खर्डी नदी पूल पावेतो गटारी व रस्ते कामासाठी ६६ लाख रुपये आणि खिरणी हट्टीत रस्ते, गटारीचा कामांसाठी १२ लाख रुपये अश्या एकूण ४ कोटी २६ लाख रुपयांचा विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. . यावेळी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, एकूण ६० दात्यांनी रक्तदान केले.
 
 
यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले. याप्रसंगी आ. राजेश पाडवी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, तहसीलदार पंकज लोखंडे, तालुका वैद्यकीय अधिकारी महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, मुख्याधिकारी सपना वसावा, भाजपा शहराध्यक्ष योगेश चौधरी, सभापती यशवंत ठाकरे, माजी उपनगराध्यक्ष अनुप उदासी, जि. प. सदस्य जितेंद्र पाडवी, प्रा. विलास डामरे, आनंद सोनार, श्याम राजपूत, विरसिंग पाडवी, किरण सूर्यवंशी, नगरसेवक रामानंद ठाकरे, भास्कर मराठे, अमोनोद्दीन शेख, सुरेश पाडवी, हेमलाल मगरे, नगरसेविका अंबिका शेंडे, हिरालाल पाडवी, नितीन पाडवी, जालंधर भोई, राजू पाडवी, नारायण ठाकरे, मुकेश बिरारे, पालिकेचे वरिष्ठ लिपिक राजेश पाडवी, लेखापाल विशाल माळी, सचिन पाटील, राजू माळी उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0