पंजाबी टिक्की...

    दिनांक : 18-Jul-2020
Total Views |
 
 
आज तुमच्यासाठी आणली आहे पंजाबी टिक्कीची रेसिपी....चवीला स्वादिष्ट आणि खाण्यास क्रिस्पी अशी भन्नाट रेसिपी आपल्यासाठी घेऊन आलोय....ती आहे पंजाबी टिक्की....नक्कीच सर्वंजण हा पदार्थ आवडीने खातील आणि पुन्हा मागतील असा विश्वास आहे....चला तर मग ट्राय करूया...आजची भन्नाट अशी रेसिपी......
 
 AALU TIKEE_1  H
 
 
साहित्य : 2 बटाटे वाफवलेले, पाव वाटी मटार, 1 चमचा भाजलेली जिरे पावडर, पाव चमचा आलं खिसून, 1 हिरवी मिरची चिरून, अर्धा चमचा लाल तिखट पावडर, अर्धा चमचा चाट मसाला पावडर, पाव चमचा गरम मसाला पावडर, 2 चमचे कोथिंबीर चिरून, चवीपुरते मीठ, 1 चमचा तेल.
सजावटीसाठी- बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा चिरून, कोथिंबीर चिरून.
 
 
कृती : वाफवलेले बटाटे सोलून मॅश करून घ्यावेत. त्यातच वाफवलेले मटार, जिरे पावडर, आलं, हिरवी मिरची, लाल तिखट पावडर, चाट मसाला पावडर, गरम मसाला पावडर, कोथिंबीर आणि मीठ घालून मिश्रण मिक्स करून पंधरा मिनिटे ठेवावे. नंतर हाताला तेल लावून छोटी टिक्की बनवून घ्यावी. आता गॅसच्या मंद आचेवर पॅन गरम करून त्यावर तेलाचे थेंब टाकून पसरवून घ्यावेत. नंतर त्यावर तयार टिक्की ठेवून दोन्ही बाजूने हलक्या सोनेरी रंगावर शालोफ्राय करावेत. आता तयार पंजाबी टिक्की टोमॅटो, कांदा आणि कोथिंबिरीने सजवून पुदिना चटणी अथवा आपल्या आवडत्या सॉससोबत खाण्यास द्यावे.