साधना सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अनिल तुपे

16 Jul 2020 14:32:59
 
 


pune-12_1  H x  
 
उपाध्यक्षपदी हनुमंत कापरे
पुणे : येथील साधना सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अनिल रतनशेठ तुपे यांची तर उपाध्यक्ष पदी हनुमंत नारायणराव कापरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

साधना सहकारी बँक लि. हडपसर ही बँक गेली ४३ वर्षापासून पुण्याच्या पूर्वभागात आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामिण भागासह राज्यात २७ शाखा एक विस्तारीत कक्ष असा बँकेचा विस्तार आहे. बँकेकडे एकूण ४६० कोटीच्या ठेवी असून २९७ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. बँक दरवर्षी सभासदांना १० टक्के लाभांश वाटप करते. बँकेच्या सभासदांसाठी मोफत आरोग्य तपासणी, कुटुंब नियोजन अनुदान, दुर्धर आजारासाठी सभासदांना आर्थिक अनुदान चालू केलेले आहे.
 
ही निवडणुक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधिकार कक्षेत सहाय्यक निबंधक एन.ए.अनपट यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी बँकेचे सुकाणू समितीचे सदस्य दिलीप तुपे, आ. चेतन तुपे आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0