जळगाव जिल्ह्यातील चार हजारावर रुग्ण कोरोनामुक्त

    दिनांक : 15-Jul-2020
Total Views |
बुधवारी २६१ नवीन रुग्णांची भर
corona_1  H x W 
जळगाव, १५ जुलै
जिल्ह्यात आणि शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बुधवारी २६१ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यातील एक सकारात्मक पैलू म्हणजे आजवर कोरोनावर विजय मिळवणार्‍या रूग्णांची संख्या चार हजारांच्या पार गेली आहे. यामुळे कोरोना विरूध्दच्या लढाईत यश मिळणार असल्याचा आत्मविश्‍वास बळावला आहे.
 
 
जिल्हा माहिती कार्यालयानुसार बुधवारी जिल्ह्यात एकूण २६१ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यात सर्वाधिक ८४ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव ग्रामीण ५, भुसावळ १४, अमळनेर ९, पाचोरा ३, भडगाव ५, धरणगाव १६, यावल ११, एरंडोल २, जामनेर ११, रावेर १९, रावेर १९, पारोळा २, चाळीसगाव ९, बोदवड १ आणि इतर जिल्ह्यातील ६ जणांचा समावेश आहे.
 
दरम्यान, आजच्या बाधितांची संख्या मिळवली असता आजवर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांचा आकडा ६६५४ इतका झालेला आहे. यातील ४ हजार ८ रूग्ण बरे झाले आहेत. तर १२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील रूग्ण वाढीचा आकडा वाढत असल्याचे यातून स्पष्टपणे अधोरेखीत झाले आहे. उपचारादरम्यान बुधवारी ९ मृत्यू झाला असून आतापर्यंत मृतांची संख्या ३५२ इतकी असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.
 
 
जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढत असल्याने बाधितांची संख्यादेखील वाढत असली तरी बरे होणार्‍यांचे प्रमाण हे लक्षणीय आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, इन्सीडंट कमांडर गोरक्ष गाडीलकर, आयुक्त सतीश कुलकर्णी आणि जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने कोरोनाविरूध्द चांगल्या उपाययोजना केल्यामुळे या युध्दात आता आपण विजय मिळवणार असल्याचा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.