जामनेरातच कोरोना रुग्णावर उपचार होण्यासाठी प्रयत्नशील : जिल्हाधिकारी

    दिनांक : 15-Jul-2020
Total Views |
 
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली जामनेर आढावा बैठकीत माहिती
 
 
जामनेर : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासत असल्यामुळे कोरोना रुग्णाना जळगाव व साकेगाव येथे पाठविण्यात येत होते. त्यामुळे त्यांची हेळसांड होत होती. आता उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटीलेटरसाठी ऑक्सिजनची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार असल्याने जामनेर तालुक्यातील कोरोना रुग्णावर आता शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बुधवार १५ रोजी सायंकाळी उपजिल्हा रुग्णालयाच्या भेटप्रसंगी दिली.
 
 
Jamner_Corona Adhava_1&nb
 
तालुक्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने रुग्ण संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानतंर त्यांनी शहरातील उपजिल्हा रुग्णालय, जी.एम. हॉस्पिटल, पळासखेडे बुद्रुक येथील कोविड सेंटरला भेट दिली.
 
 
Jamner_Corona Adhava1_1&n
 
त्यावेळी तहसीलदार अरुण शेवाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.के. पाटील, डॉ.हर्षल चांदा, डॉ.प्रशांत पाटील, डॉ.जयश्री पाटील, जितेंद्र पाटील, डॉ.प्रशांत भोंडे, अरविंद देशमुख आदी उपस्थित होते.