बोदवड येथे भर रस्त्यावरील खड्डा ठरतोय अपघाताला निमंत्रण

15 Jul 2020 19:25:41
 
 
बोदवड : येथील मुक्ताईनगर रोडवरील कॉम्प्लेक्स समोर एका कंपनीने दहा बाय दहा मीटरचा खोल गड्डा पाच दिवसांपासून खोदलेला आहे. या खड्यातील माती रस्त्यावर टाकली असून ये-जा करणार्‍या वाहनांना त्रास होत असून समोरच व्यापारींची दुकाने असून त्यांना याचा त्रास होत असून एकतर्फी वाहने काढावी लागतात.
 
 
Bodwad Khadda_1 &nbs
 
याबाबत न.पं.चे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांना याबाबत विचारले असता हा खड्डा ओडीओचा असून बीएसएनएल कंपनीची वायरींग तुटल्या आहेत. संबंधित अधिकारी यांना याबाबत वारंवार सांगितले आहे.
 
 
एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर हरिष भोरे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, संबधित ठेकेदाराला सांगितले की जर ठेकेदाराने गुरुवार संध्याकाळपर्यंत तो खड्डा बुजला नाही तर मी स्वतः तो खड्डा बुजणार असल्याचे सांगितले. जवळपास पाच दिवसापांसून हा खड्डा खोदलेला आहे रात्री एक दुचाकीस्वार त्यात जावून पडला पण दुर्दैवाने त्याला काही झाले नाही यावरुन कंपनीचा किती भोंगळ कारभार व शासनाच्या अधिकार्‍यांची किती दिरंगाई यावरुन दिसून येते.
Powered By Sangraha 9.0