बोदवड परिसरात ढगफुटी

14 Jul 2020 19:20:04
 

bodavad_1  H x  
 
पावसामुळे एक हजार हेक्टर क्षेत्रावरील पीके उध्दवस्त,
सुरवाडे, मानमोडीत पीके जमीनदोस्त
बोदवड : परिसरात सोमवारी रात्री  १२ वाजेच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडला. बोदवडपासून १० कि.मी. अंतरावर असलेले सुरवाडे बु, सुरवाडे खुर्द, मानमोडी येथे ढगफुटी होऊन शेतकर्‍यांची पिके जमिनदोस्त झाली आहे. साधरणत: एक हजार एकरापेक्षा जास्त क्षेत्रावरील पीके उध्वस्त झाले आहेत. वादळासह झालेल्या धुव्वाधार पावसामुळे पीकासह शेतीही वाहून गेली आहे. शेतातील पाईप सुद्धा पाण्यात वाहून गेले आहेत. एका शेतकर्यांचा बैल सुद्धा त्यात मृत्यु पावला
 
 अगोदरच परिसरातील शेतकर्‍यांनी दुबार पेरणी केली असून या अस्मानी संकटामुळे शेतकरी अजून हतबल झाला आहे. या ढगफुटीमुळे अंदाजे एक हजार एकर शेतीतील पीकाचे नुकसान झाले आहे. अगोदरच बोदवड तालुका हा दुष्काळग्रस्त असून शेतकरी व शेती व्यवसाय तोट्यात आहे.
शासनाने त्वरीत पंचनामा करुन शेतकर्‍यांना मदत करावी अशी मागणी जि.प. सदस्य वर्षा पाटील यांनी केली आहे. आ. चंद्रकांत पाटील यांनीही नुकसानग्रस्त शेती क्षेत्रास भेट दिली.
तहसीलदारांकडून पाहणी
मंगळवारी सकाळी तहसीलदार हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या. संध्याकाळपर्यंत १०० शेतकर्‍याच्या नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे केले आहेत. उर्वरीत पंचनामे लवकर करुन शासनाला पाठवणार असल्याचे बोदवडचे तहसीलदार हेंमत पाटील यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0