नव्याने आढळले २०५ कोरोनाबाधित रूग्ण

13 Jul 2020 20:31:39
जिल्ह्यात कोरोनाने ओलांडला सहा हजाराचा  टप्पा

corona_1  H x W 
 
जळगाव, १३ जुलै
जिल्ह्यात सोमवारी नव्याने २०५ कोरोनाबाधित रूग्ण आढळूनन आले असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६ हजार १६७ झाली आहे. नवीन आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरात सर्वाधिक ५६ जणांचा समावेश आहे. तर दिवसभरात ६ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
 
 
जळगाव जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर ५६, जळगाव ग्रामीण ९, भुसावळ १६, अमळनेर ८, चोपडा ९, पाचोरा ६, भडगाव १, धरणगाव २२, यावल ७, एरंडोल २३, जामनेर ५, रावेर ११, पारोळा १५, चाळीसगाव ४, मुक्ताईनगर ७, बोदवड ५, अन्य जिल्ह्यातील एक अशी रूग्ण संख्या आहे. कोरोनामुळे दिवसभरात ६ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यात चाळीसगाव तालुक्यातील २, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, रावेर, बोदवड तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0