पाचोर्‍यात विनापरवाना मद्याची चोरटी वाहतूक

10 Jul 2020 20:23:12
 
 
53 हजाराच्या मुद्देमालासह एकास पोलिसांनी घेतले ताब्यात
 
 

Pachora_bear1_1 &nbs 
 
पाचोरा : येथे शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पाचोर्‍यातील भुयारी मार्ग येथे आरोपी शरद अरविंद चव्हाण (रा.राजीव गांधी कॉलोनी पाचोरा) हा मोटर सायकल क्र. एम एच-19/डी एम-3677 वरून बियरच्याची चोरटी वाहतूक करतांना पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे व पोलीस नाईक राहुल सोनवणे यांना आढळून आला. त्यास 3780 रुपये किंमतीच्या मद्यासह (बिअर) व 50 हजार रुपये किंमतीच्या दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले आहे.
 

Pachora_bear_1   
 
पाचोरा पोलिसात किरण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शरद अरविंद चव्हाण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटरसायकल ही माजी नगरसेवक चंदू केसवानी यांच्या मालकीची असल्याचे समजते. त्यांच्याच बियर शॉपी वरून विनापरवाना बियरची चोरटी वाहतूक केली जात असल्याची चर्चा आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राहुल सोनवणे करीत आहे.
Powered By Sangraha 9.0