कोविड केअर सेंटर, विलगीकरण कक्षावर महापौर, नगरसेवकांची नजर

10 Jul 2020 19:55:14
 
mayor_1  H x W:
 
जळगाव, १० जुलै
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मिळणार्‍या सेवासुविधा योग्य आहेत की नाही डॉक्टर, कर्मचार्‍यांना काय अडचणी आहेत हे जाणून घेण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक मनपाच्या कोविड केअर सेंटर व विलगीकरण कक्षावर गेल्या दोन दिवसांपासून नजर ठेवून आहे.
 
सकाळी १० वाजताच महापौर भारती सोनवणे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, रियाज बागवान, मनोज आहुजा, सचिन पाटील, अमित काळे, मुकुंदा सोनवणे, नवनाथ दारकुंडे, दिपमाला काळे, मीनाक्षी पाटील, किशोर चौधरी, अतुलसिंग हाडा, गोकुळ पाटील आदी कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण कक्षाजवळ पोहचले. यावेळी त्यांनी रुग्ण आणि डॉक्टरांशी चर्चा केली.
 
आयुक्तांना पत्र
महापौर भारती सोनवणे व सर्वपक्षीय नगरसेवकांनी कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण कक्षात जाऊन चर्चा केली असता त्यांनी काही अडचणी मांडल्या होत्या. अडचणींच्या अनुषंगाने महापौरांनी तात्काळ मनपा आयुक्तांना त्याबाबत पत्र दिले आहे. कोविड केअर सेंटरसाठी तातडीने डॉक्टर्स, आया, परिचारिका आणि कर्मचार्‍यांची संख्या वाढविणे, मुबलक औषधी, सामुग्री पुरवठा करणे, रुग्णवाहिका, ६ गरम पाण्याच्या केटली, ४ वॉशिंग मशीन, माईक सिस्टीम पुरविण्यात यावी अशी मागणी महापौर भारती सोनवणे यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0