लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्‍या ३६ जणांवर कारवाई

10 Jul 2020 19:53:38

cirme_1  H x W: 
 
जळगाव, १० जुलै
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शहरात ७ ते १३ जुलैपर्यंत लॉकडाऊन आहे. असे असताना सुद्धा विनाकारण घराबाहेर पडणार्‍या ३६ जणांवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करण्यात आली. तसेच वाहने जप्त करण्यात आली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
शहरात दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यावर उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शहरासह अमळनेर आणि भुसावळ येथे १३ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. परंतु, असे असताना अनेक पोलिसांची नजर चुकवत शहरात फिरत असतात. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. त्यामुळे दुचाकीवर डबल सीट आणि चारचाकी वाहनात दोन सीट बसवून शहरात फिरणार्‍या ३६ जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
ही कारवाई पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पोहेकॉ विजय नेरकर, प्रदीप पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, नितीन पाटील, असीम तडवी, निलेश पाटील, इम्रान सैय्यद, मुदसर काझी आदींनी केली.
Powered By Sangraha 9.0