गोलाणी मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य

08 Jun 2020 16:39:20
व्यापार्‍यांनी मांडल्या आमदारांकडे व्यथा
 

MLA Bhole_1  H  
 
जळगाव, ८ जून 
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोलाणी मार्केटमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. याबाबत येथील व्यापार्‍यांनी सोमवारी आ.सुरेश भोळे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. सर्व समस्या ऐकून घेत याबाबत लवकरच संबंधित अधिकार्‍यांशी बोलून त्या सोडविण्याचे आश्‍वासन आ.भोळे यांनी दिले.
 
 
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून संपूर्ण मार्केट पूर्णपणे बंद आहे. तेव्हापासून येथे दैनंदिन स्वच्छता करणारे कर्मचारी येत नाहीत. त्यामुळे सर्वत्र कचर्‍याचे ढिंग जमा झालेले आहे. तसेच येथील बहुतांश स्वच्छता बंद असून जे सुरु आहेत त्यामध्ये अत्यंत दुर्गैंधी परसलेली आहे. यासह कुत्र्यांनी दुकानांसमोर घाण केली आहे. याबाबत अनेकवेळा येथील व्यापार्‍यांनी मनपा प्रशासनास सूचना, तक्रारी केली. परंतु, त्याचा कुठलाच फायदा झालेला नाही. दरम्यान, येथील व्यावसायिक सुरेश लुल्ला यांनी आ.सुरेश भोळे यांना गोलाणी मार्केटमध्ये येवून प्रत्यक्ष परिस्थिती दाखविली. यावेळी मंगला बारी, पूनम परदेशी, दीपक तलरेजा, चेतन राजपाल, अमित नाथानी यांच्यासह इतर व्यावसायिक उपस्थित होते.
 
 
दरम्यान, लॉकडाऊनमध्ये मनपाअंगर्तत तसेच खासगी मार्केटमधील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, दुकाने सुरु करण्यासंदर्भातही व्यापार्‍यांनी आ.सुरेश भोळे यांना संागितले.
 
 
Powered By Sangraha 9.0