लोंढरी येथील तरुण कोरोनाबाधित

07 Jun 2020 20:47:59

Corona_1  H x W
 
 
पहूर ता. जामनेर : पहूरपासून जवळच असलेल्या लोंढरी बु. येथील २० वर्षीय तरुणाचा तपासणी अहवाल पॉझीटिव्ह आला आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या तरुणास चार दिवसांपूर्वी जळगाव येथील गोदावरी हास्पीटलमध्ये शस्त्रक्रीयेसाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याचा तपासणी अहवाल पॉझीटिव्ह आल्याने त्याच्या कुटूंबातील नऊ जणांचे स्वॅब घेतले जाणार असून त्यांना जामनेर येथील कोविड सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याचे नोडल अधिकारी डा. हर्षल चांदा यांनी सांगितले. लोंढरी ग्रामपंचायतीने या तरूण राहत असलेल्या परिसरात फवारणी करून निर्जंतूकीकरण केले आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0