जळगाव जिल्ह्यात शनिवारी आढळले ६३ कोरोनाबाधित

06 Jun 2020 21:45:20
 एकूण संख्या झाली १०२०
 
 
Corona_1  H x W
 
 
जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून शनिवारी पुन्हा नवीन ६३ कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आकडा १०२० इतका झाला आहे.
 
 
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव ५, अमळनेर १०, रावेर ६, एरंडोल १, फैजपूर १,भडगाव १, जामनेर २, भुसावळ ५, चोपडा ९, चाळीसगाव २, धरणगाव ४ असे एकूण ४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या १००१ इतकी झाली असून जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ११७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
 
 
दरम्यान, या आकडेवारीतून अमळनेर आणि चोपडा तालुक्यांमध्ये संसर्ग वाढल्याचे दिसून आले आहे. अमळनेरात मध्यंतरी स्थिती आटोक्यात आली होती. तथापि, अलीकडच्या काळात आधी प्रमाणेच रूग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तर चोपडा तालुक्यातील कोरोना बाधीतांचे प्रमाण देखील आता चिंताजनक झाल्याचे दिसून येत आहे.
 
 
८३ अहवाल निगेटिव्ह
दरम्यान, शनिवारी खासगी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविलेल्यापैकी ८३ कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
Powered By Sangraha 9.0