जळगावसह भडगाव आणि यावलमध्ये वाढले रुग्ण

    दिनांक : 30-Jun-2020
Total Views |
 
 
मंगळवारी जिल्ह्यात आढळले नवे १४४ बाधित
 
 
जळगाव : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ मंगळवारीही कायम होती. मंगळवारी जिल्ह्यात १४४ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तसेच जळगावसह भडगाव आणि यावलमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचेही दिसून येत आहे.
 

Corona_1  H x W 
 
 
जिल्हा माहिती कार्यालयाच्या अहवालानुसार, मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यात १४४ नवे रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक रूग्णसंख्या २४ ही जळगाव शहरातील आहे. यासोबतच भडगाव आणि यावलमध्ये प्रत्येकी १९ कोरोनाबाधित रूग्ण असल्याचे आढळून आले आहे.
 
 
उर्वरित जिल्ह्याचा विचार करता, जळगाव ग्रामीण-०५, भुसावळ व एरंडोल-प्रत्येकी एक, चाळीसगाव व पाचोरा-प्रत्येकी ४, जामनेर व चोपडा-प्रत्येकी ११, पारोळा-८, अमळनेर-२, धरणगाव-६, बोदवड-७, मुक्ताईनगर-९ व रावेर-१३ असे रूग्ण आढळून आले आहेत.
 
 
या अहवालानुसार, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ३५८२ झाली आहे. यातील २१११ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या १२२८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यात आजवर २४४ रूग्ण दगावले आहेत.